Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यातही चेहरा चमकेल सोन्यासारखा! फक्त 'या' 7 सोप्या टिप्स फॉलो करा

Manish Jadhav

जेंटल क्लीन्झिंग

पावसाळ्यात हवेतील दमटपणामुळे त्वचेवर धूळ आणि तेल जमा होते. त्यामुळे दिवसातून 2-3 वेळा सौम्य (Mild) किंवा सॅलिसिलिक ॲसिड असलेल्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवावा.

Skin Care | Dainik Gomantak

एक्सफोलिएशन गरजेचे

मृत त्वचा (Dead Skin) आणि पोर्समधील घाण काढण्यासाठी आठवड्यातून 1 ते 2 वेळा स्कीन एक्सफोलिएट (Scrub) करा. यामुळे त्वचा ताजी आणि चमकदार राहील.

Skin Care | Dainik Gomantak

टोनिंग नक्की करा

पावसाळ्यात त्वचा तेलकट झाल्यामुळे पोर्स मोठे होतात. त्वचेचा 'pH लेव्हल' संतुलित ठेवण्यासाठी आणि पोर्स घट्ट करण्यासाठी अल्कोहोल-मुक्त टोनर किंवा गुलाब पाण्याचा वापर करा.

Skin Care | Dainik Gomantak

लाईटवेट मॉइश्चरायझर

हवामानात आधीच आर्द्रता असली तरी मॉइश्चरायझर लावणे सोडू नका. या दिवसांत हेवी क्रीमऐवजी जेल-बेस्ड (Gel-based) किंवा वॉटर-बेस्ड लाईटवेट मॉइश्चरायझर वापरावे.

Skin Care | Dainik Gomantak

सनस्क्रीन विसरु नका

ढगाळ वातावरण असले तरी सूर्याची हानिकारक अतिनील किरणे त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे घराबाहेर पडताना किंवा घरात असतानाही 'नॉन-स्टिकी' सनस्क्रीन आवर्जून लावा.

Skin Care | Dainik Gomantak

अँटी-बॅक्टेरियल फेस पॅक

पावसाळ्यातील इन्फेक्शन आणि पिंपल्स टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंब, हळद किंवा मुलतानी मातीचा फेस पॅक वापरा, ज्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित होईल.

Skin Care | Dainik Gomantak

हायड्रेशन आणि आहार

फक्त बाहेरुनच नाही तर आतूनही त्वचा निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा आणि तेलकट-तिखट खाणे टाळा.

Skin Care | Dainik Gomantak

मुली सिंगल राहण का पसंद करतायेत? 'ही' 7 कारणे ऐकून व्हाल थक्क

आणखी बघा