Monsoon Skin Itching: पावसाळ्यात अंगाला सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका; 'हे' सोपे घरगुती उपाय देतील आराम

Sameer Amunekar

त्वचा नेहमी कोरडी ठेवा

पावसात भिजल्यानंतर लगेच शरीर स्वच्छ पुसून कोरडे करा. ओलसर त्वचेमुळे बुरशी आणि खाज वाढू शकते.

Monsoon Skin Itching | Dainik Gomantak

कोमट पाण्याने अंघोळ करा

खूप गरम पाणी टाळा. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि खाज कमी होते.

Monsoon Skin Itching | Dainik Gomantak

नारळाचे तेल लावा

अंघोळीनंतर शुद्ध नारळाचे तेल लावल्याने त्वचा मॉइश्चराइज राहते आणि खाज व कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

Monsoon Skin Itching | Dainik Gomantak

अ‍ॅलोवेरा जेल वापरा

ताज्या अ‍ॅलोवेरा जेलमुळे त्वचेला थंडावा मिळतो. जळजळ, लालसरपणा आणि खाज कमी होण्यास मदत होते.

Monsoon Skin Itching | Dainik Gomantak

सैल आणि सुती कपडे घाला

घट्ट किंवा सिंथेटिक कपड्यांमुळे घाम अडकतो. सुती कपडे घातल्यास त्वचेला हवा मिळते आणि खाज कमी होते.

Monsoon Skin Itching | Dainik Gomantak

भरपूर पाणी प्या

शरीर हायड्रेट ठेवल्यास त्वचा निरोगी राहते. दिवसातून पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा.

Monsoon Skin Itching | Dainik Gomantak

खाज वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

खाज अनेक दिवस कायम राहणे, पुरळ, पाणी येणे किंवा सूज दिसल्यास हे बुरशीजन्य किंवा त्वचारोगाचे लक्षण असू शकते. अशावेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Monsoon Skin Itching | Dainik Gomantak

पावसाळ्यात शरीर गरम ठेवायचंय? रोज फक्त 15 मिनिटं करा 'ही' 7 योगासनं

Monsoon Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा