Monsoon Health Tips: पावसाळ्यात शरीर गरम ठेवायचंय? रोज फक्त 15 मिनिटं करा 'ही' 7 प्रभावी योगासनं

Sameer Amunekar

ताडासन

शरीराचा तोल सुधारण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढवण्यासाठी ताडासन उपयुक्त आहे. दिवसाची सुरुवात या आसनाने करा.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

सूर्यनमस्कार

अवघ्या 5-7 फेऱ्यांमध्ये संपूर्ण शरीर सक्रिय होते. शरीरात उष्णता निर्माण होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

उत्कटासन

मांड्या, पाय आणि कोअर मजबूत करणारे हे आसन शरीरातील ऊर्जा वाढवते आणि थंडी कमी जाणवण्यास मदत करते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

वीरभद्रासन

हे आसन स्नायूंना बळकटी देऊन रक्तप्रवाह सुधारते. पावसाळ्यातील सुस्ती दूर करण्यासाठी प्रभावी ठरते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

भुजंगासन

पाठ आणि छाती खुली ठेवणारे हे आसन शरीरात उब निर्माण करते. श्वसनक्रियाही सुधारते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

सेतूबंधासन

पाठ, कंबर आणि पाय मजबूत करताना शरीरातील रक्ताभिसरण वाढवते. थकवा आणि आळस कमी होतो.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायाम

दररोज 5 मिनिटे हे प्राणायाम केल्यास शरीरात उष्णता टिकून राहते, फुफ्फुसांचे कार्य सुधारते आणि पावसाळ्यातील संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

पावसाळ्यातही मेकअप राहील 'झक्कास'! फॉलो करा 'या' 7 टिप्स

Waterproof Makeup Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा