Monsoon Skin Care: पावसाळ्यात महागड्या क्रीम्स ठरतील फेल, चेहरा काचेसारखा चमकेल! मान्सून स्किन केअरच्या 7 अत्यंत प्रभावी टिप्स

Manish Jadhav

जेंटल फेसवॉशन

पावसाळ्यात हवेतील चिकटपणामुळे त्वचेवर धूळ आणि तेल सहज जमा होते. म्हणूनच, दिवसातून दोनदा ऑईल-फ्री किंवा कडुनिंब आणि टी-ट्री ऑईल घटक असलेला फेसवॉश वापरा, ज्यामुळे पिंपल्स येणे थांबेल.

Skin Care Tips | Dainik Gomantak

एक्सफोलिएशन विसरु नका

त्वचेवरील मृत पेशी आणि साचलेले अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी आठवड्यातून 1-2 वेळा हलके स्क्रबिंग करणे आवश्यक आहे.

Skin Care Tips | Dainik Gomantak

जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा

हवेत आधीच ओलावा असल्याने जड किंवा जास्त तेलकट क्रीम वापरणे टाळा. या ऋतूत वॉटर-बेस्ड किंवा जेल-बेस्ड मॉइश्चरायझरची निवड करा, जे त्वचेला चिकट न करता योग्य पोषण देतात.

Skin Care Tips | Dainik Gomantak

सनस्क्रीन आवश्यक

पावसाळ्यात सूर्य दिसत नसला तरी त्याचे घातक अतिनील किरण ढगांमधूनही त्वचेचे नुकसान करु शकतात. त्यामुळे घराबाहेर पडताना किंवा घरात असतानाही रोज नॉन-स्टिकी सनस्क्रीन नक्की लावा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

मुलतानी मातीचा फेस पॅक

पावसाळ्यात बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. यासाठी आठवड्यातून एकदा मुलतानी माती, चिमूटभर हळद आणि कडुनिंबाच्या पानांची पेस्ट एकत्र करुन लावा. यामुळे त्वचा निर्जंतुक आणि तेलमुक्त राहील.

Skin Care Tips | Dainik Gomantak

मिनिमल आणि वॉटरप्रूफ मेकअप

या दिवसांत जास्त हेवी मेकअप करणे टाळावे, कारण घामामुळे आणि पावसामुळे रोमछिद्र बंद होऊन पुरळ येऊ शकते. आवश्यक असल्यास फक्त हलक्या आणि वॉटरप्रूफ उत्पादनांनाच प्राधान्य द्या.

Skin Care Tips | Dainik Gomantak

भरपूर पाणी प्या आणि ओलावा टाळा

हवेतील गारव्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, पण त्वचा आतून डिटॉक्स करण्यासाठी दिवसातून 8-10 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच, चेहरा धुतल्यानंतर तो स्वच्छ आणि कोरड्या टॉवेलने पूर्ण पुसून घ्या, चेहऱ्यावर जास्त वेळ ओलसरपणा राहू देऊ नका.

Skin Care Tips | Dainik Gomantak

Amer Fort: अंधारात शिसमहल बनतो प्रकाशाचा महासागर, लाल दगड आणि पांढऱ्या संगमरवराचा अद्भुत नजरा; 400 हून अधिक वर्षांचा 'अंबर किल्ला'

आणखी बघा