Sameer Amunekar
पावसाळ्यात सतत आर्द्रता आणि घामामुळे त्वचेवर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. ओले कपडे जास्त वेळ न घालता त्वचा कोरडी ठेवावी.
घट्ट कपडे, सिंथेटिक मटेरियलचे कपडे टाळा. हलके, सूती कपडे घालल्याने त्वचेला श्वास घेता येतो आणि फंगल संसर्ग टळतो.
पाय, मान, पोटाजवळ आर्द्रता साठते. या जागी अँटीफंगल पावडर किंवा डॉक्टरांनी सुचवलेली क्रीम वापरल्याने संसर्ग कमी होतो.
दररोज नीट अंघोळ करा, विशेषतः पावसात भिजल्यानंतर. सौम्य साबण व कोमट पाण्याने त्वचा धुतल्याने जंतू वाढत नाहीत.
पावसाळ्यात पाणी साचलेले असते. ओल्या चपला किंवा बुटांमुळे पायात संसर्ग होऊ शकतो. घरी आल्यावर पाय धुवून कोरडे करा आणि स्वच्छ चप्पल/मोजे वापरा.
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. विटामिन्स, प्रोटीन आणि पुरेसे पाणी घेतल्यास त्वचा निरोगी राहते आणि संसर्गाला लढण्याची ताकद मिळते.
नीमची पाने उकळून त्याच्या पाण्याने अंघोळ करणे, हळदीचा लेप लावणे किंवा अॅलोवेरा जेल वापरणे हे संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.