दारू की सिगारेट… कोणतं व्यसन सोडणं जड आहे?

Sameer Amunekar

शरीरावर परिणाम

सिगारेटमध्ये असलेलं निकोटीन शरीरात पटकन व्यसनाधीनता निर्माण करतं. दारूमुळे मानसिक अवलंबित्व (psychological dependence) जास्त दिसून येतं.

Alcohol And Cigarette Addiction | Dainik Gomantak

लक्षणं

सिगारेट सोडल्यावर चिडचिड, तणाव, डोकेदुखी, झोप न लागणं अशी लक्षणं दिसतात. दारू सोडल्यावर शरीर थरथरणं, चिंता, झोपेचा अभाव, कधी कधी फिट्स (seizures) येऊ शकतात.

Alcohol And Cigarette Addiction | Dainik Gomantak

मानसिकदृष्ट्या खोलवर

दारूचे व्यसन मानसिकदृष्ट्या खोलवर पसरतं; सामाजिक जीवन, पार्टी, तणाव कमी करण्यासाठी लोक वारंवार पितात. सिगारेट जास्त करून सवयीमुळे ओढली जाते, पण मानसिक जोड दारूपेक्षा थोडी कमी असते.

Alcohol And Cigarette Addiction | Dainik Gomantak

शारीरिक

निकोटीन शरीराच्या प्रत्येक पेशीला सराव करून टाकतो, त्यामुळे वारंवार सिगारेटची गरज भासते. दारूमुळे यकृत, मेंदू, हृदय यावर गंभीर परिणाम होतो; मात्र शरीर निकोटीनसारखी त्वरित craving निर्माण करत नाही.

Alcohol And Cigarette Addiction | Dainik Gomantak

सामाजिक स्वीकार्यता

दारू सामाजिकदृष्ट्या अनेक ठिकाणी "मान्य" असते (पार्ट्या, फंक्शन्स). त्यामुळे सोडणं कठीण होतं. सिगारेट मात्र सार्वजनिक ठिकाणी बंदीमुळे हळूहळू टाळणं सोपं होतं.

Alcohol And Cigarette Addiction | Dainik Gomantak

सोडण्यास मदत करणारे पर्याय

सिगारेटसाठी निकोटीन पॅच, गम्स, मेडिकेशन उपलब्ध आहेत. दारू सोडण्यासाठी थेरपी, रिहॅब, औषधोपचारांची गरज जास्त भासते.

Alcohol And Cigarette Addiction | Dainik Gomantak

तज्ज्ञांचं मत

बहुतांश अभ्यासानुसार सिगारेटमधलं निकोटीन हे दारूपेक्षा अधिक व्यसनाधीन करणारे आहे. पण दारू सोडल्यावर होणारी लक्षणं अधिक धोकादायक आणि जीवघेणी असू शकतात.

Alcohol And Cigarette Addiction | Dainik Gomantak

द्राक्षाच्या पानांचे फायदे

Grape Leaves Benefits | Dainik Gomantak
येथे क्लिक करा