Sameer Amunekar
पावसाळ्यातील पालेभाज्यांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला हानीकारक फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि नैसर्गिक ग्लो मिळवून देतात.
पालेभाज्यांमध्ये असणारे व्हिटॅमिन C त्वचेला उजळ ठेवण्यास आणि कोलेजन निर्मितीस मदत करते.
पालेभाज्यांतील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेला नैसर्गिक हायड्रेशन मिळते, ज्यामुळे त्वचा टवटवीत दिसते.
हिरव्या पालेभाज्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात, त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज दिसून येतो.
पावसाळ्यातील पालेभाज्यांमध्ये असणारे लोह व फॉलिक अॅसिड त्वचेला आरोग्यदायी ठेवतात आणि चेहरा उजळतात.
त्वचेच्या पेशींच्या दुरुस्तीला मदत करणारे झिंक आणि आयर्न पालेभाज्यांमधून मिळतात, जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
पावसाळ्यात संसर्ग होण्याचा धोका वाढतो, मात्र पालेभाज्यांमधील पोषक घटक त्वचेचे संरक्षण करतात आणि नैसर्गिक चमक कायम ठेवतात.