Sameer Amunekar
पावसात रस्ते ओले असतात, त्यामुळे अचानक ब्रेक लावल्यास गाडी घसरू शकते. हळू आणि मोजून ब्रेक द्या.
टायरची ग्रिप चांगली असल्याशिवाय पावसात ड्राइव्ह करणे धोकादायक ठरू शकते. टायरमध्ये योग्य हवेचा दाब आणि ट्रेण्ड असायला हवा.
ओल्या रस्त्यांवर वळण घेताना वेग कमी ठेवा, अन्यथा गाडीवर नियंत्रण सुटण्याचा धोका असतो.
पाण्यातून गाडी चालवल्यास इंजिन बंद पडू शकते किंवा गाडी अडकू शकते. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसेल तर रस्ता बदलावा.
दृष्य स्पष्ट ठेवण्यासाठी वायपर्स आणि हेडलाइट्स योग्य स्थितीत असाव्यात.
समोरील वाहनाशी नेहमीच सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून अचानक ब्रेक लागला तरी अपघात टाळता येईल.
हवामान खराब असताना वेग कमी ठेवा. पावसात जास्त वेगात गाडी घसरण्याचा धोका अधिक असतो.