गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याच्या पाऊस म्हणजे जणू सिम्फनीची लय आहे. गोव्याच्या भूमीत मान्सूनची जादू जिवंत होते.
इथल्या शांततेत पावसाचे थेंब वादकाचे काम करतात. कधी ती लय मधुर असते तर कधी धडकी भरवणारी.
ग्रामीण भागातील सुशेगाद जीवनात मान्सूनचे संगीत सुखदायक असते. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे असते.
हिरव्यागार टेकड्या आणि धुक्याने लपेटलेले घाट पावसाला उत्तम साथ देत सुसंवाद साधतात.
पाऊस पडत जाईल तसा नद्या आपला आकार बदलत वाहणाऱ्या पाण्याने निसर्गाच्या संगीत प्रवासात मेलडी भरतात.
किनाऱ्यावर भिजलेल्या वाळूच्या सोबत समुद्र गोव्याच्या मान्सूनमध्ये फेर धरतो. त्याचे रूप कधी कधी कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाते.
शहरी भागात रंगांच्या उधळणीसोबत पाऊस मैफिल सजवतो. मान्सूनची सिम्फनी शहरवासीयांना त्याच्या लयीनुसार अनुभव देत असते.
निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा गोव्यातील एक 'खास' उत्सव