Sameer Amunekar
मेकअप करण्यापूर्वी वॉटरप्रूफ किंवा मॅट प्रायमर लावा. यामुळे मेकअप त्वचेवर अधिक वेळ टिकतो आणि घामामुळे सहज पसरत नाही.
जड फाउंडेशनऐवजी लाइटवेट, लॉन्ग-लास्टिंग आणि वॉटरप्रूफ फाउंडेशन वापरा. त्यामुळे चेहरा नैसर्गिक आणि फ्रेश दिसतो.
काजळ, आयलाइनर आणि मस्कारा नेहमी वॉटरप्रूफ निवडा. पावसात किंवा दमट हवेतही डोळ्यांचा मेकअप खराब होत नाही.
पावडर ब्लशपेक्षा क्रीम ब्लश किंवा लिप-चीक टिंट अधिक काळ टिकते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लोही कायम राहतो.
मेकअप पूर्ण झाल्यानंतर हलक्या हाताने ट्रान्सल्युसंट पावडर लावा. यामुळे अतिरिक्त तेल नियंत्रित राहते आणि मेकअप सेट होतो.
शेवटी चांगल्या दर्जाचा मेकअप सेटिंग स्प्रे वापरा. तो मेकअपला लॉक करून पावसाळ्यातही दीर्घकाळ टिकवून ठेवतो.
चेहऱ्यावर घाम किंवा अतिरिक्त तेल दिसल्यास टिश्यूने घासू नका. ब्लॉटिंग पेपर वापरल्याने मेकअप न खराब करता चेहरा फ्रेश दिसतो.