Monsoon Kitchen Care Tips: पावसाळ्यात आजारी पडायचे नसेल, तर आजच बदला किचनमधील 'या' 8 सवयी

दैनिक गोमन्तक डिजिटल

एअरटाईट कंटेनर्सचा वापर करा

धान्य सुरक्षित ठेवा.पावसाळ्यातील दमट हवेमुळे डाळी, तांदूळ, सुकामेवा आणि पीठ लवकर खराब होते किंवा त्याला किडे लागतात. म्हणूनच सर्व अन्नधान्य काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकच्या एअरटाईट (हवाबंद) डब्यात भरून ठेवा.

Airtight containers storing grains and spices | Dainik Gomantak

किचन ओटा आणि सिंक नेहमी कोरडे ठेवा

बॅक्टेरियापासून बचाव.किचनचा ओटा आणि भांडी घासण्याचे सिंक ओले राहिल्यास तिथे बॅक्टेरिया वेगाने वाढतात. रात्री झोपण्यापूर्वी सिंक पूर्णपणे स्वच्छ करून कोरडे करा आणि आठवड्यातून एकदा गरम पाणी आणि जंतुनाशक टाकून स्वच्छ करा.

Dry kitchen sink and countertop | Dainik Gomantak

ओल्या हातांनी मसाले काढणे टाळा

मसाल्यांचे संरक्षण.पावसाळ्यात मीठ, साखर आणि मसाल्यांना लवकर पाणी सुटते. मसाल्यांच्या डब्यात नेहमी कोरडे चमचे वापरा. मीठ आणि साखरेला ओलसरपणापासून वाचवण्यासाठी त्यात थोडे तांदळाचे दाणे टाकून ठेवू शकता.

Dry hand taking spices from spice container | Dainik Gomantak

भाज्या आणि फळे गरम पाण्याने धुवा

इन्फेक्शन रोखा.पावसाळी हवेमुळे भाज्यांवर बारीक किडे आणि जंतू असण्याची शक्यता जास्त असते. पालेभाज्या, फळभाज्या बाजारातून आणल्यावर त्या मिठाच्या किंवा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून, पूर्ण वाळवून मगच फ्रीजमध्ये ठेवा.

Washing vegetables and fruits with warm water | Dainik Gomantak

ओल्या कचऱ्याची रोज विल्हेवाट लावा

कीटकांना दूर ठेवा.किचनमधील ओल्या कचऱ्यामुळे माश्या, डास आणि झुरळे वाढतात. डस्टबिनला नेहमी झाकण असावे आणि रोजच्या रोज ओला कचरा घराबाहेर टाकावा. डस्टबिनच्या तळाशी थोडी बेकिंग सोडा पावडर टाकल्यास दुर्गंधी येत नाही.

Kitchen wet waste bin being emptied | Dainik Gomantak

इलेक्ट्रॉनिक उपकरणांची काळजी

विजेची सुरक्षा.पावसाळ्यात भिंतींना ओल आल्यामुळे मिक्सर, ओव्हन किंवा फ्रीजला अर्थिंग येण्याचा किंवा शॉक लागण्याचा धोका असतो. कोणतीही वस्तू वापरण्यापूर्वी तुमचे हात कोरडे आहेत याची खात्री करा आणि वायर्स उघड्या नसतील याकडे लक्ष द्या.

Clean and dry kitchen appliances | Dainik Gomantak

पिण्याचे पाणी उकळून घ्या

शुद्ध पाणी.पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे आजार वेगाने पसरतात. वॉटर प्युरिफायर (Water Purifier) वेळेवर सर्व्हिस करून घ्या. शक्य असल्यास या दिवसांत पिण्याचे पाणी नेहमी उकळून आणि कोमट करूनच प्या.

Boiled drinking water in kitchen | Dainik Gomantak

किचन नॅपकिन्स रोज बदला

स्वच्छ कपडे.भांडी आणि हात पुसण्यासाठी वापरले जाणारे कपडे किंवा नॅपकिन्स पावसाळ्यात लवकर सुकत नाहीत आणि वास मारतात. दमट कपड्यांमध्ये बुरशी तयार होते. म्हणूनच किचन नॅपकिन्स रोजच्या रोज कडक डिटर्जंटने धुवून व्यवस्थित वाळवून वापरा.

Fresh clean kitchen towel | Dainik Gomantak

लहान मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात? 'या' 8 सोप्या टिप्स वापरून वाढवा त्यांची अभ्यासातील गोडी

Parenting Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा