दैनिक गोमन्तक डिजिटल
पहिली पायरी.मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी रोज एकच वेळ आणि घरातील एक शांत कोपरा निश्चित करा. तिथे खेळणी किंवा टीव्हीचा आवाज नसावा, जेणेकरून त्यांचे लक्ष विचलित होणार नाही.
डिजिटल डिटॉक्स.मुलं जेव्हा अभ्यासाला बसतात, तेव्हा घरातील टीव्ही, मोबाईल किंवा टॅबलेट पूर्णपणे बंद ठेवा. पालकांनीही त्यांच्यासमोर मोबाईल वापरणे टाळावे, कारण मुलं तुमचेच अनुकरण करतात.
छोटे ब्रेक्स. लहान मुलांना सलग तास-दोन तास अभ्यासाला बसवू नका. त्यांना २५ ते ३० मिनिटे अभ्यास करू द्या आणि नंतर ५ मिनिटांचा छोटा ब्रेक द्या. यामुळे त्यांचा मेंदू फ्रेश राहतो.
आनंदी शिक्षण. केवळ पाठांतर करून घेण्याऐवजी गोष्टी, चित्रे, रंग किंवा प्रयोगांच्या माध्यमातून विषय समजावून सांगा. विशेषतः गणित आणि विज्ञान यांसारखे विषय खेळत-खेळत शिकवल्यास मुलांना ते सोपे वाटतात.
प्रोत्साहन द्या. मुलाने एखादा छोटा गृहपाठ पूर्ण केला, तरी त्याचे तोंडभरून कौतुक करा. "हा अभ्यास संपवला की आपण तुझा आवडता खेळ खेळू," असे छोटे आणि सकारात्मक आमिष दाखवून त्यांना प्रोत्साहित करा.
संयम ठेवा. "शेजाऱ्यांच्या मुलाला बघ कती मार्क मिळाले," अशी तुलना कधीही करू नका. अभ्यास न केल्यास मारहाण केल्याने मुलांच्या मनात अभ्यासाबद्दल भीती आणि राग निर्माण होतो.
पालकांचा सहभाग.मुलांना एकटं सोडून अभ्यास करायला सांगण्याऐवजी तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत बसा. ते अभ्यास करत असताना तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता किंवा ऑफिसचे काम करू शकता, यामुळे मुलांना सोबत मिळते.
नित्यक्रम. मुलांना केवळ घोकंपट्टी करायला लावू नका. त्यांना त्या संकल्पनेचा अर्थ समजला आहे की नाही, हे तपासा. समजलेला भाग त्यांनी स्वतःच्या शब्दांत सांगितल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो.