Akshata Chhatre
पावसाळा आला, की घरात माश्यांचा त्रास वाढतोच. विशेषतः स्वयंपाकघर, खिडक्या आणि कचराकुंडीजवळ माश्यांची गर्दी होते.
केवळ त्रासच नाही, तर या माश्यांमुळे आरोग्य धोक्यात येते, कारण त्या अनेक प्रकारचे रोग पसरवू शकतात. बाजारातील केमिकल स्प्रे वा उपकरणे खूप वेळा अपुरी ठरतात.
कापूर जाळल्याने तयार होणारा धूर माश्यांना सहन होत नाही. एका छोट्या चमच्यावर कापूर ठेवा, तो पेटवा आणि घरात फिरवा.
एक ग्लास पाण्यात थोडे मीठ आणि व्हिनेगर मिसळा. या द्रावणाने घरातील जमिनी, खिडक्या, ओटे आणि टेबल्स पुसा. यामुळे केवळ माश्यांपासून सुटका होणार नाही, तर बॅक्टेरियाही नष्ट होतील.
सफरचंद सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळून स्प्रे बाटलीत भरून ठेवा. ही फवारणी माश्या दिसणाऱ्या भागात नियमित करा.
पावसाळ्यात झाडू-पुसताना पाण्यात थोडं फिनाईल मिसळा. यामुळे घर स्वच्छ राहील आणि माश्यांचा त्रास कमी होईल. ही पद्धत वर्षानुवर्षे वापरली जाते आणि अजूनही प्रभावी आहे.