Monsoon Tips: पावसाळा सुरू झालाय! 'या' सोप्या टिप्स नक्की वापरा, ऋतूमानातील आजार आणि इन्फेक्शनपासून राहाल दूर

Sameer Amunekar

नेहमी उकळलेले पाणी प्या

पावसाळ्यात जलजन्य आजारांचा (Waterborne Diseases) धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे पाणी नेहमी चांगल्या प्रकारे उकळून आणि गाळूनच प्या.

Monsoon Tips | Dainik Gomantak

स्ट्रीट फूड आणि उघड्यावरील अन्न टाळा

या दिवसांत हवेतील आर्द्रतेमुळे जीवाणूंची (Bacteria) वाढ झपाट्याने होते. त्यामुळे बाहेरचे, उघड्यावरील किंवा तळलेले अन्न खाणे टाळा आणि घरी बनवलेले ताजे अन्न खा.

Monsoon Tips | Dainik Gomantak

वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या

बाहेरून आल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा. पावसाच्या पाण्यात भिजल्यास लगेच अंघोळ करा आणि शरीर पूर्णपणे कोरडे करा, जेणेकरून फंगल इन्फेक्शन होणार नाही.

Monsoon Tips | Dainik Gomantak

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

आजारांशी लढण्यासाठी आहारात आल्याचा चहा, हळदीचे दूध, लिंबू, आणि व्हिटॅमिन-सी युक्त फळांचा समावेश करा. यामुळे तुमची इम्युनिटी मजबूत राहा.

Monsoon Tips | Dainik Gomantak

डासांपासून स्वतःचा बचाव करा

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा त्रास वाढतो. घराभोवती पाणी साचू देऊ नका, मॉस्किटो रिपेलेंट वापरा आणि झोपताना डासदाणीचा वापर करा.

Monsoon Tips | Dainik Gomantak

ओले कपडे आणि पादत्राणे घालणे टाळा

दमट वातावरणामुळे कपडे आणि शूज लवकर सुकत नाहीत. दमट किंवा थोडेही ओले असलेले कपडे घातल्याने त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकते, त्यामुळे पूर्ण सुकलेले कपडेच वापरा.

Monsoon Tips | Dainik Gomantak

हिरव्या पालेभाज्या धुताना घ्या काळजी

पावसाळ्यात पालेभाज्यांवर कीटक आणि बॅक्टेरिया असण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच पालेभाज्या वापरण्यापूर्वी त्या कोमट पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्या.

Monsoon Tips | Dainik Gomantak

नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी आजपासूनच फॉलो करा 'या' 7 सोप्या टिप्स

Glowing Skin | Dainik Gomantak
येथे क्लिक करा