मान्सून एन्जॉय करा टेन्शन फ्री! पावसात भिजूनही आजारी न पडण्यासाठी फॉलो करा 'या' 7 गोष्टी

Sameer Amunekar

कोमट पाण्याने अंघोळ

पावसात भिजून घरी आल्यावर लगेच कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि जंतूंचा संसर्ग टाळण्यास मदत होते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

केस नीट कोरडे करा

पावसात भिजल्यावर डोक्याचे केस ओले राहिल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे भिजल्यावर लगेच टॉवेलने केस नीट कोरडे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

गरमागरम वाफाळलेला काढा किंवा चहा

भिजल्यानंतर आले, तुळस, मिरी आणि दालचिनी घालून तयार केलेला गरमागरम काढा किंवा हर्बल टी प्या. हे तुमच्या शरीराला उबदार ठेवेल आणि प्रतिकारशक्ती वाढवेल.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

ओले कपडे त्वरित बदला

भिजलेले कपडे शरीरावर जास्त वेळ ठेवू नका. ते त्वरित बदलून सुती आणि कोरडे कपडे घाला, जेणेकरून त्वचेचे इन्फेक्शन किंवा थंडी लागण्यापासून बचाव होईल.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

हाता-पायांची स्वच्छता

पावसात भिजताना रस्त्यावरील साचलेले पाणी अंगावर उडते, ज्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. घरी आल्यावर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवा.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

आहारात घ्या व्हिटॅमिन-सी

पावसाळ्यात आजारपणाला लांब ठेवण्यासाठी आहारात लिंबू, संत्री, आवळा यांसारख्या व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचा समावेश करा. हे नैसर्गिकरित्या तुमची इम्युनिटी वाढवतात.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

पुरेशी विश्रांती आणि ऊबदारपणा

पावसात भिजून आल्यानंतर थोडा वेळ उबदार कपडे घालून आराम करा. शरीर पुन्हा नॉर्मल तापमानाला येण्यासाठी पुरेसा विश्रांती घेणे आवश्यक आहे.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

लोहगड किल्ल्याची सफर का ठरते अविस्मरणीय?

Lohagad Fort | Dainik Gomantak
येथे क्लिक करा