Sameer Amunekar
१३ व्या शतकात बांधलेला लोहगड हा किल्ला आदिलशाही, मुघल आणि मराठा साम्राज्याच्या संघर्षाचा साक्षीदार आहे. १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला.
'लोहगड' म्हणजे लोखंडासारखा मजबूत किल्ला. येथील भक्कम तटबंदी आणि भव्य दरवाजे आजही पर्यटकांना या किल्ल्याच्या शौर्याची आणि स्थापत्यशास्त्राची साक्ष देतात.
सह्याद्रीच्या रांगांमध्ये १,०३३ मीटर (३,३८९ फूट) उंचीवर वसलेला हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक आव्हानात्मक आणि आनंददायी अनुभव देतो.
पावसाळ्यात या किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलते. चहूकडे पसरलेली हिरवळ, दऱ्याखोऱ्यांतून वाहणारे धबधबे आणि धुक्याची चादर पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.
किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारे विस्तीर्ण पवना धरण आणि सभोवतालच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचे दृश्य पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते.
साहसी पर्यटकांच्या आवडीचा हा परिसर आहे. लोहगड आणि शेजारील विसापूर किल्ला अशा दोन्ही किल्ल्यांचा एकत्रित ट्रेक करणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.
किल्ल्यावर वावरताना तुम्हाला शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा, जुन्या वास्तूंचे अवशेष आणि मजबूत बुरुज जवळून पाहता येतात, जे इतिहासाची एक वेगळी ओळख करून देतात.