Sameer Amunekar
पावसाळ्यात हवामानात गारवा असतो. अशा वेळी फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने घशाचे विकार, सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते.
थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे अन्नाचे पचन संथ होते आणि अपचन किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे आजारांचा धोका जास्त असतो. थंड पाणी शरीराचे तापमान अचानक कमी करते, ज्यामुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत होऊ शकते.
ज्यांना सांधेदुखी किंवा संधिवाताचा त्रास आहे, त्यांनी विशेषतः थंड पाणी टाळावे. यामुळे सांध्यांमधील वेदना आणि सूज वाढण्याची शक्यता असते.
फ्रिजमधील अति थंड पाण्यामुळे दातांच्या नसांवर ताण येतो. यामुळे दात संवेदनशील होणे (Sensitive teeth) आणि झणझण होणे अशा समस्या सुरू होऊ शकतात.
आयुर्वेदानुसार, थंड पाणी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याऐवजी त्यांना शरीरातच साठवून ठेवते, ज्यामुळे मेटाबॉलिझमवर वाईट परिणाम होतो.
काही संशोधनानुसार, अति थंड पदार्थ किंवा पाणी प्यायल्याने मेंदूकडे जाणार्या नसा थंड होऊन ‘ब्रेन फ्रीज’ सारखी स्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अचानक डोकेदुखी सुरू होऊ शकते.