Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस दिसतील अधिक सुंदर आणि दाट; फॉलो करा 'हे' घरगुती उपाय

Sameer Amunekar

कोरफडीचा वापर

पावसाळ्यात केसांमधील आर्द्रता कमी होते. कोरफड जेल केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केस हायड्रेटेड राहतात आणि केसांची वाढ चांगली होते.

Monsoon Hair Care Tips | Dainik Gomantak

नारळाचे तेल आणि कढीपत्ता

नारळाच्या तेलात कढीपत्त्याची पाने गरम करून हे तेल कोमट असताना केसांच्या मुळांना लावा. कढीपत्त्यातील पोषक घटक केसांना आतून पोषण देतात आणि केस दाट करण्यास मदत करतात.

Monsoon Hair Care Tips | Dainik Gomantak

मेथी दाण्यांचा हेअर मास्क

रात्रभर भिजवलेले मेथी दाणे सकाळी वाटून त्याची पेस्ट तयार करा. हे मिश्रण केसांना लावून ३० मिनिटांनी धुवा. यामुळे केस गळणे कमी होऊन ते मजबूत होतात.

Monsoon Hair Care Tips | Dainik Gomantak

आवळा आणि शिककाई

आवळा आणि शिककाई पावडरची पेस्ट केसांना लावून नैसर्गिकरीत्या केस स्वच्छ करा. यामुळे केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकून राहतो आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.

Monsoon Hair Care Tips | Dainik Gomantak

दह्याचा हेअर पॅक

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे टाळूची (Scalp) स्वच्छता राखतात. दह्याचा मास्क लावल्याने केसांना कंडिशनिंग मिळते आणि केस मऊ व चमकदार दिसतात.

Monsoon Hair Care Tips | Dainik Gomantak

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावल्याने टाळूतील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केस गळती थांबते आणि नवीन केस येण्यास (Hair growth) मोठी मदत होते.

Monsoon Hair Care Tips | Dainik Gomantak

हेअर वॉशकडे लक्ष द्या

पावसाचे पाणी केसांवर पडल्यास ते लगेच शॅम्पूने स्वच्छ करा, कारण पावसात असणाऱ्या प्रदूषित घटकांमुळे केस कमकुवत होऊ शकतात. सौम्य शॅम्पूचा वापर करणे कधीही चांगले.

Monsoon Hair Care Tips | Dainik Gomantak

दूधधारेसारखा कोसळणारा 'दुधसागर'; पावसाळ्यात पर्यटकांसाठी ठरतोय मुख्य आकर्षण

Dudhsagar Waterfall | Dainik Gomantak
येथे क्लिक करा