Sameer Amunekar
पावसाळ्यात मनी प्लांटची वाढ झपाट्याने होते. कमी देखभालीतही हे झाड घराला आकर्षक लूक देते.
लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची जास्वंद फुले पावसाळ्यात भरभरून येतात. बागेचे सौंदर्य वाढवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
तुळस वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करते. पावसाळ्यात योग्य निचऱ्याची काळजी घेतल्यास तिची वाढ चांगली होते.
झेंडूची रंगीत फुले बागेला आकर्षक बनवतात. हे झाड कमी देखभालीतही सहज फुलते.
अरेका पाम इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही ठिकाणी सुंदर दिसतो. ओलसर हवामानात त्याची वाढ चांगली होते.
कमी सूर्यप्रकाश आणि कमी पाण्यातही स्नेक प्लांट सहज वाढतो. घरातील हवा शुद्ध ठेवण्यासही मदत करतो.
कुंडीत पाणी साचू देऊ नका, योग्य ड्रेनेज ठेवा, कुजलेली पाने वेळेवर काढा आणि गरजेनुसार सेंद्रिय खत द्या. त्यामुळे झाडे निरोगी राहून घराला नैसर्गिक सौंदर्य मिळेल.