Homemade Korean Night Cream: घरच्या घरी तयार करा कोरियन नाईट क्रीम; 1500 खर्च न करता मिळवा पार्लरसारखा ग्लो

Sameer Amunekar

महागड्या क्रीमला घरगुती पर्याय

फक्त तीन साध्या घटकांपासून घरच्या घरी कोरियन स्टाइल नाईट क्रीम तयार करा आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो द्या.

Homemade Korean Night Cream | Dainik Gomantak

लागणारे 3 घटक

तांदळाचे पाणी, कोरफडीचा गर (Aloe Vera Gel) आणि 2 व्हिटॅमिन E कॅप्सूल – एवढेच साहित्य पुरेसे आहे.

Homemade Korean Night Cream | Dainik Gomantak

क्रीम बनवण्याची सोपी पद्धत

2 चमचे कोरफडीचा गर + 2 चमचे तांदळाचे पाणी एकत्र फेटा. त्यात व्हिटॅमिन E मिसळून जेलसारखी क्रीम तयार करा.

Homemade Korean Night Cream | Dainik Gomantak

त्वचेला मिळणारे फायदे

ही क्रीम त्वचेला हायड्रेट ठेवते, मऊपणा वाढवते, नैसर्गिक चमक देते आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचे पोषण करते.

Homemade Korean Night Cream | Dainik Gomantak

कशी वापराल?

रात्री चेहरा स्वच्छ धुवून क्रीम चेहरा आणि मानेवर लावा. हलक्या हाताने मसाज करून रात्रभर तसेच ठेवा.

Homemade Korean Night Cream | Dainik Gomantak

किती दिवस साठवू शकता?

प्रिझर्व्हेटिव्ह नसल्यामुळे क्रीम हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवा आणि 3–4 दिवसांच्या आत वापरा.

Homemade Korean Night Cream | Dainik Gomantak

महत्त्वाची सूचना

क्रीमचा रंग किंवा वास बदलल्यास वापरू नका. संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा. लक्षात ठेवा, ही घरगुती क्रीम त्वचेला मॉइश्चर आणि तात्पुरती चमक देऊ शकते; "आरशासारखी" त्वचा मिळेल याची खात्रीशीर हमी नाही.

Homemade Korean Night Cream | Dainik Gomantak

अभ्यासाचा ताण न घेता मुलं बनतील रॅँकर्स! नक्की वाचा 'या' अत्यंत मोलाच्या टीप्स

Effective Study Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा