दैनिक गोमन्तक डिजिटल
पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यातून लेप्टोस्पायरोसिससारखे गंभीर आजार पसरण्याचा धोका असतो. पायाला साधी जखम किंवा कट्स असतील तर जंतू शरीरात सहज प्रवेश करू शकतात. त्यामुळे पायांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.
पावसाळ्यात पाय सतत ओले राहिल्याने बोटांच्या फटींमध्ये बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) वेगाने वाढतो. यामुळे त्वचा पांढरी पडणे, खाज सुटणे किंवा जखमा होण्याचा त्रास होतो.
रस्त्यावरील चिखल आणि घाण पाणी पायांच्या नखांमध्ये साचून राहते. यामुळे नखांना बुरशी लागून नखे खराब होणे, कुजणे किंवा ठिसूळ होण्याचा धोका असतो.
पावसाळ्यात शूज किंवा सॉक्स ओले झाल्यामुळे किंवा पायाला सतत घाम आल्यामुळे जंतूंची वाढ होते आणि पायाला तीव्र दुर्गंधी येते. ही कोंदट हवेमुळे होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी योग्य फुट केअर आवश्यक आहे.
पावसाळ्यात चिखल आणि दूषित पाण्याच्या सततच्या संपर्कामुळे पायांची त्वचा कोरडी आणि कडक बनते. यामुळे टाचांना मोठ्या भेगा पडतात आणि काही वेळा त्यातून रक्त येऊन वेदना होतात.
पावसाळ्यात योग्य चप्पल किंवा सँडल न वापरल्यास पाय घसरून पडण्याचा धोका असतो. तसेच प्लास्टिक किंवा रबरच्या अयोग्य चपलांमुळे पायाला फोड (Shoe Bite) येऊ शकतात.
अनेकांना वाटते की पावसाळ्यात पाय ओले राहतात म्हणजे त्यांना मॉइश्चरायझरची गरज नाही. पण वारंवार पाय धुतल्याने पायांमधील नैसर्गिक ओलावा निघून जातो, त्यामुळे रात्री झोपताना फुट क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावणे गरजेचे असते.
दिवसभर पावसात आणि चिखलात फिरून पाय थकतात. आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात थोडे मीठ आणि शॅम्पू टाकून पाय स्वच्छ केल्याने पायांचा थकवा दूर होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.