Monsoon Eye Infection: जळजळ अन् सतत खाज? पावसाळ्यात उद्भवतात डोळ्यांचे 'हे' 7 गंभीर आजार; वेळीच व्हा सावध

Manish Jadhav

डोळे येणे

पावसाळ्यात हा संसर्ग सर्वात वेगाने पसरतो. पावसाचे दूषित पाणी डोळ्यात गेल्यामुळे किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे डोळे लाल होतात, जळजळ होते आणि डोळ्यातून पाणी किंवा चिकट द्रव येऊ लागतो.

Monsoon eye Infection | Dainik Gomantak

कॉर्नियल अल्सर

पावसाचे दूषित पाणी, धूळ किंवा कचरा डोळ्यात गेल्यास आणि डोळा जास्त चोळल्यास कॉर्नियाला दुखापत होऊन तिथे जखम किंवा अल्सर होऊ शकतो. हा एक गंभीर आजार आहे.

Monsoon eye Infection | Dainik Gomantak

रांजणवाडी

पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे डोळ्यांच्या पापण्यांच्या मुळाशी असलेल्या ग्रंथींमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होते. यामुळे पापणीवर एक लहान, वेदनादायक पुरळ किंवा पुळी येते, ज्याला सामान्य भाषेत रांजणवाडी म्हणतात.

Monsoon eye Infection | Dainik Gomantak

कोरडे डोळे

पावसाळ्यात सतत चालणारे एसी आणि हवेतील ओलसरपणामुळे डोळ्यांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. यामुळे डोळे कोरडे पडणे, खाज सुटणे किंवा डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे वाटणे अशा समस्या उद्भवतात.

Monsoon eye Infection | Dainik Gomantak

डोळ्यांची ॲलर्जी

पावसाच्या पाण्यासोबत हवेत तरंगणारे परागकण, बुरशी आणि धूळ यांचे प्रमाण वाढते. यामुळे डोळ्यांना तीव्र ॲलर्जी होऊन डोळे सतत खाजवणे, लाल होणे आणि पापण्यांना सूज येणे अशा समस्या होतात.

Monsoon eye Infection | Dainik Gomantak

ब्लेफेरायटिस

पावसाळ्यातील दमट हवेमुळे डोळ्यांच्या पापण्यांच्या कडांवर तेल ग्रंथी बंद होतात. यामुळे पापण्यांना सूज येते, त्या लाल होतात आणि पापण्यांच्या मुळाशी कोंड्यासारखे पांढरे पापुद्रे जमा होतात.

Monsoon eye Infection | Dainik Gomantak

स्टॅफिलोकोकल संसर्ग

पावसाच्या साचलेल्या घाण पाण्यातून ‘स्टॅफिलोकोकस’ नावाचे बॅक्टेरिया डोळ्यात प्रवेश करु शकतात. यामुळे डोळ्याला गंभीर संसर्ग होऊन दृष्टी अंधुक होणे किंवा तीव्र वेदना होण्याचा धोका असतो.

Monsoon eye Infection | Dainik Gomantak

Asirgarh Fort: फितुरीचा डाग अन् अकबराचा विजय! 'सोन्याच्या किल्ल्यांनी' उघडले दख्खनचे द्वार; असीरगडचा थक्क करणारा इतिहास

आणखी बघा