Asirgarh Fort: फितुरीचा डाग अन् अकबराचा विजय! 'सोन्याच्या किल्ल्यांनी' उघडले दख्खनचे द्वार; असीरगडचा थक्क करणारा इतिहास

Manish Jadhav

'दख्खनचे द्वार'

असीरगड किल्ल्याला ऐतिहासिक काळात 'दख्खनचे द्वार' किंवा 'दक्षिणची किल्ली' म्हटले जायचे. उत्तर भारतातून दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी या किल्ल्यावर ताबा असणे अत्यंत गरजेचे मानले जात होते.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

राजा आसा अहिरने केली स्थापना

या किल्ल्याची स्थापना चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला 'आसा अहिर' नावाच्या एका मेंढपाळ राजाने केली होती. त्याच्याच नावावरुन या किल्ल्याला 'असीरगड' हे नाव मिळाले. पुढे फारुकी वंशाच्या राजाने येथे सत्ता स्थापन केली.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

अकबराची शेवटची मोहीम

मोगल सम्राट अकबराच्या आयुष्यातील ही शेवटची लष्करी मोहीम होती. इसवी सन 1601 मध्ये अकबराने असीरगड जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. हा किल्ला जिंकल्यानंतरच अकबराला संपूर्ण खानदेशवर नियंत्रण मिळवता आले.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

सोन्याच्या किल्ल्यांनी उघडले दरवाजे

असीरगड इतका अभेद्य होता की, अकबरालाही तो सहजासहजी जिंकता येत नव्हता. इतिहासकारांच्या मते, अकबराने किल्ल्याच्या रक्षकांना सोन्या-चांदीची लाच देऊन फितूर केले आणि 'सोन्याच्या किल्ल्यांनी' या अजेय किल्ल्याचे दरवाजे उघडले.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

किल्ल्याची त्रिसूत्री रचना

हा किल्ला एकूण तीन भागांमध्ये विभागलेला आहे, ज्यामुळे शत्रूला यावर हल्ला करणे अशक्यप्राय व्हायचे. या तीन भागांना अनुक्रमे असीरगड, कमरगढ आणि मलयगढ या नावांनी ओळखले जाते.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

महाभारतातील अश्वत्थामाचे रहस्य

या किल्ल्याशी एक अत्यंत थरारक पौराणिक कथा जोडलेली आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार, महाभारतातील अमर पात्र 'अश्वत्थामा' आजही या किल्ल्यावरील शिवमंदिरात दररोज पहाटे येऊन पूजेसाठी ताजी फुले आणि चंदन अर्पण करतो.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

पाण्याचे कधीही न आटणारे स्त्रोत

किल्ल्यावर डोंगराच्या शिखरावर असूनही अनेक पाण्याचे तलाव आहेत. उन्हाळ्यातही या तलावांमधील पाणी कधीही आटत नाही, जे तत्कालीन उत्कृष्ट जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण मानले जाते.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

Bhangarh Fort: काळी जादू, तांत्रिकाचा आक्रोश आणि उद्ध्वस्त झालेलं साम्राज्य; 'भानगड'चा अंगावर काटा आणणारा इतिहास

आणखी बघा