Sameer Amunekar
काही लोकांच्या त्वचेला कोरफड सूट होत नाही, त्यामुळे खाज, लालसरपणा किंवा पुरळ येऊ शकतात.
कच्च्या कोरफडीतील अॅलॉइन या घटकामुळे त्वचेवर जळजळ किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
अतिसंवेदनशील त्वचेसाठी कोरफड हानीकारक ठरू शकते, त्यामुळे वापरण्यापूर्वी टेस्ट करणे आवश्यक आहे.
कोरफडीचा रोज किंवा वारंवार वापर केल्यास त्वचेमधील नैसर्गिक तेल निघून त्वचा कोरडी व खवखवायला लागते.
बाजारात मिळणाऱ्या काही कोरफड जेलमध्ये रासायनिक घटक असतात, जे त्वचेसाठी अपायकारक ठरू शकतात.
कोरफड वापरल्यानंतर लगेच परिणाम दिसतीलच असे नाही, काही वेळा त्रास हळूहळू दिसतो.
त्वचेसंबंधी समस्या असताना तज्ज्ञांचा सल्ला न घेता कोरफड वापरल्यास त्रास वाढू शकतो.