Mohammed Siraj: गोष्ट टीम इंडियाच्या स्ट्राईकरची...

Ashutosh Masgaunde

हॅप्पी बर्थडे सिराज

13 मार्च 1994 रोजी जन्मलेल्या मोहम्मद सिराजचा आज 30 वा वाढदिवस आहे. खूप कमी काळात सिराजने क्रिकेट विश्वावर आपली छाप सोडली आहे. तो भारताचा स्ट्राईक गोलंदाज म्हणून उदयास आला आहे.

Mohammed Siraj | X/BCCI

कुटुंब

सिराजचे वडील मोहम्मद घौस हे ऑटोचालक होते आणि आई इतरांच्या घरी काम करते. त्याचे उत्पन्न फारसे नव्हते. मात्र, वडिलांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांच्या मार्गात आर्थिक चणचण येऊ दिली नाही.

Mohammed Siraj | PTI

रणजी ट्रॉफी

सिराजने 2016-17 हंगामात हैदराबादला रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यास मदत केली. त्याने नऊ सामन्यांमध्ये 41 विकेट घेतल्या होत्या.

Mohammed Siraj | Dainik Gomantak

आयपीएल

रणजी ट्रॉफीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे सिराजला आयपीएलमध्ये मोठा ब्रेक मिळाला. आयपीएलच्या 10 व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादने वेगवान गोलंदाज सिराजला 2.6 कोटींमध्ये विकत घेतले होते.

Mohammed Siraj | Dainik Gomantak

खास कनेक्शन

सिराजचे विराट कोहलीशी खास नाते आहे. जेव्हा सिराज कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीमध्ये खेळत होता तेव्हापासून दोघांमध्ये एक वेगळाच बाँड तयार झाला आहे.

Mohammed Siraj | Dainik Gomantak

टीम इंडियाला प्राधान्य

2020 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला तेव्हा सिराजच्या वडिलांचे निधन झाले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी सिराजने मायदेशी न परतता संघासाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला.

Mohammed Siraj | Dainik Gomantak

Rishabh Pant Comeback: अशी आहे पंतची आयपीएलमधील कामगिरी

Rishabh Pant