गोमन्तक डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटमधील एक प्रसिद्ध क्रिकेटपटू महमद कैफ हे सध्या परिवारासह गोव्यात आनंद लुटत आहे.
मालपे ट्रॉलर्सच्या प्रकरणावेळी पेले नावाचा एक मच्छिमार बराच प्रसिद्ध झाला होता, आणि आज महमद कैफ याच पेलेच्या होडीत पाहायला मिळाले.
महमद कैफ यांचा परिवारासोबतचा हा व्हिडीओ बराच व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मोहंमद कैफ त्यांची पत्नी पूजा व मुलगी इव्हासह आढळतात.
काल सोमवारी संध्याकाळी कैफ कुटुंबियांसह बाणावली समुद्र किनार्यावर आले होते, कारण त्यांना त्याला वास्तविक जेटस्कीचा अनुभव घ्यायचा होता.
पेलेसह कैफ आणि परिवार आज दुसऱ्यावेळा समुद्रात उतरले आणि त्यांच्या मते हा अनुभव विलक्षण होता.
आज मी मासेमारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. हे विश्र्व आमच्या क्रिकेट विश्र्वापेक्षा अधिक रोमांचक आहे अशी प्रतिक्रिया कैफ यांनी व्यक्त केली.
पत्नी आणि मुलीसह गोव्यात आलेले कैफ बाणावली येथील ताज एक्झाॅटिकामध्ये सध्या राहायला आहेत.