गोमन्तक डिजिटल टीम
गोवा राज्यात मानसिक स्वास्थ्याच्या सद्य:स्थितीचा अभ्यास स्वास्थ्य केंद्रांनी केल्यावर मानसिक अनारोग्य असलेल्यांचे प्रमाण अंदाजे दहा टक्के असल्याचे समोर आले आहे.
एकूण सतरा लाख लोकसंख्येचा विचार केला तर केवळ पंचाहत्तर हजार लोकांचेच हे सर्वेक्षण म्हणजे हजारातील चार हे प्रमाण निघते.
२०१५-१६च्या त्या राष्ट्रीय सर्वेक्षणात वयस्कांपैकी १०.६ टक्के लोकांना मानसिक स्वास्थ्याच्या तक्रारी असल्याचे समोर आले होते.
गोव्यात विद्यार्थी, सुशिक्षित बेकार युवक, गृहिणी व तरुणी, वृद्ध-वयस्क या सर्व गटांत मानसिक अनारोग्याचे प्रमाण खूप आहे.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय व्यवस्थेतील अनास्था, बेपर्वाई, राजकारण्यांची विश्वासघातकी वागणूक आणि स्वार्थी वृत्ती, बेसुमार आणि बेलगाम भ्रष्टाचार, मनमानी आणि अरेरावी या साऱ्यांना तोंड देत जगणे भाग आहे.
कर्मचारी निवड आयोग, गोवा राज्य लोकसेवा आयोग यांना डावलून नोकऱ्यांच्या विक्री व्यवसायाला मंत्री पहिली पसंती देतात.
मानसिक अस्वास्थ्याचे प्रमाण दहावरून पंधरा टक्क्यांवर गेल्याचेही नवीन अभ्यासात दिसल्याचे सांगण्यात आले.
गोव्यात तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मानसिक ताणाचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाचीच नव्हे, तर अगदी प्रमुख आहे