Mohamed Muizzu: ''आता कळेल मालदीवची जनता स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर...''

Manish Jadhav

भारत-मालदीव संबंध

भारत-मालदीव यांच्यातील संबंध अजूनही कमालीचे ताणेलेले आहेत. यातच आता चीन धार्जिण्या मोहम्मद मोइज्जू यांनी संसदीय निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारली.

Maldives President Mohamed Muizzu | Dainik Gomantak

संसदीय निवडणुकीत घवघवीत यश

मालदीवमध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी घवघवीत यश मिळवले. मालदीवच्या जनतेने चीन धार्जिण्या मोइज्जू यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला.

Maldives President Mohamed Muizzu | Dainik Gomantak

सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर

संसदीय निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर सोमवारी एका कार्यक्रमात मोइज्जू बोलताना म्हणाले की, ''मालदीवचे लोक विशेषत: सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर कुठे उभे आहेत हे आता आंतरराष्ट्रीय समुदायाला समजेल.''

Maldives President Mohamed Muizzu | Dainik Gomantak

मोइज्जू यांच्या पक्षाने 68 जागा जिंकल्या

रविवारी झालेल्या निवडणुकीत मोइज्जू यांचा पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) ने 93 पैकी 68 जागा जिंकल्या.

Maldives President Mohamed Muizzu | Dainik Gomantak

मोइज्जू यांचा विजय भारताला धक्का

संसदीय निवडणुकीतील मोइज्जू यांचा विजय हा भारताच्या परराष्ट्र धोरणाला धक्का मानला जात आहे. हिंद महासागरातील या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या देशातील निवडणुकांच्या निकालावर भारत आणि चीन या दोन्ही देशांचे बारकाईने लक्ष होते.

Maldives President Mohamed Muizzu | Dainik Gomantak

इंडिया आऊट कॅम्पेन चालवले

काही महिन्यांपूर्वी मोइज्जू यांनी भारताशी पंगा घेत मालदीवमध्ये इंडिया आऊट कॅम्पेन चालवले. या कॅम्पेनच्या जोरावरच ते गेल्या वर्षी सत्तेत आले. नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारताच त्यांनी चीनला भेट दिली आणि संरक्षणासह विविध क्षेत्रात बीजिंगसोबत करार केले.

Maldives President Mohamed Muizzu | Dainik Gomantak

मालदीवच्या जनतेचा विश्वास

कोणत्याही देशाचे नाव न घेता मोइज्जू म्हणाले की, संसदीय निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध केले आहे की मालदीवच्या जनतेला परकीय दबावाशिवाय त्यांच्या भविष्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे आहे.

Maldives President Mohamed Muizzu | Dainik Gomantak
Simon Harris | Dainik Gomantak