Gardening Tips: मोगऱ्याची इम्युनिटी 'डाऊन' झालीय? पाण्यात थोडं ताक मिसळा आणि रोपाला द्या देसी 'एनर्जी बूस्टर'!

Manish Jadhav

भरपूर सूर्यप्रकाश द्या

मोगऱ्याच्या रोपाला चांगल्या फुलांसाठी दिवसातून किमान 4 ते 6 तास थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो. कुंडी किंवा रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे ऊन नीट येईल.

Gardening Tips | Dainik Gomantak

केळ्याच्या सालीचे खत वापरा

केळ्याच्या सालींमध्ये पोटॅशियम भरपूर असते, जे कळ्या आणि फुले येण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. पिकलेल्या केळ्याची साले सुकवून त्यांचा चुरा मातीत मिसळा किंवा पाण्यात भिजवून ते पाणी झाडाला द्या.

Gardening Tips | Dainik Gomantak

चहाच्या पानांचा वापर करा

वापरलेली चहाची पाने स्वच्छ धुऊन आणि वाळवून कुंडीतील मातीत मिसळा. यामुळे मातीतील पोषण वाढते आणि मोगऱ्याची वाढ चांगली होते.

Gardening Tips | Dainik Gomantak

पाण्याचा निचरा आणि योग्य पाणी

कुंडीत पाणी साचून राहू देऊ नका; अन्यथा मुळे सडू शकतात. माती कोरडी वाटल्यावरच गरजेपुरते पाणी घाला.

Gardening Tips | Dainik Gomantak

ताक किंवा दह्याचे पातळ द्रावण

महिन्यातून एखाद्या वेळा पाण्यात थोडे ताक मिसळून ते मातीत किंवा झाडावर हलके शिंपडल्यास झाडाची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि वाढ जोमाने होते.

Gardening Tips | Dainik Gomantak

वेळोवेळी हलकी छाटणी करा

फुले सुकल्यानंतर ती तसेच ठेवून देण्याऐवजी थोडी छाटणी करा. यामुळे झाडाला नवीन फांद्या आणि जास्त कळ्या फुटायला मदत होते.

Gardening Tips | Dainik Gomantak

माती भुसभुशीत ठेवा

कुंडीतील माती दगडासारखी घट्ट होऊ देऊ नका. दर 15-20 दिवसांनी खुरप्याने माती हलकी मोकळी करा, जेणेकरून मुळांना हवा आणि खत नीट मिळेल.

Gardening Tips | Dainik Gomantak

Gardening Tips: गुलाबाला भरभरुन फुले हवीत? मग नवीन रोप लावताना 'या' चुका कधीच करु नका

आणखी बघा