Gardening Tips: गुलाबाला भरभरुन फुले हवीत? मग नवीन रोप लावताना 'या' चुका कधीच करु नका

Manish Jadhav

खूप खोलवर रोप लावू नका

रोप लावताना त्याचा जोड (ग्राफ्टिंगचा भाग) मातीच्या वर राहील याची काळजी घ्या. खूप खोल लावल्यास रोप कुजण्याचा किंवा वाढ खुंटण्याचा धोका असतो.

7 mistakes to avoid when planting new rose plant | Dainik Gomantak

पाणी साचून राहणारी माती वापरु नका

चिकट किंवा एकदम घट्ट मातीत गुलाब चांगला वाढत नाही. माती भुसभुशीत असावी आणि कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेसे छिद्र असावे.

7 mistakes to avoid when planting new rose plant | Dainik Gomantak

रासायनिक खत देऊ नका

नवीन रोप लावल्यावर लगेच रासायनिक खत दिल्यास नाजूक मुळे जळू शकतात. किमान 2 ते 3 आठवड्यांनी रोप मातीत रुळल्यावरच हलके खत द्या.

7 mistakes to avoid when planting new rose plant | Dainik Gomantak

कडक उन्हात रोप लावणे टाळा

भर दुपारच्या कडक उन्हात रोप लावू नका किंवा ठेवू नका. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या थंड वेळी रोप लावा आणि सुरुवातीचे काही दिवस कोवळे ऊन मिळेल अशा जागी ठेवा

7 mistakes to avoid when planting new rose plant | Dainik Gomantak

पिशवी काढताना मुळांना इजा होऊ देऊ नका

नर्सरीतील पिशवी किंवा कुंडी काढताना मातीचा गोळा मोडू देऊ नका आणि मुळे तुटू देऊ नका. मुळांना धक्का बसल्यास रोप शॉकमध्ये जाऊन सुकू शकते.

7 mistakes to avoid when planting new rose plant | Dainik Gomantak

अंधारात किंवा सावलीत ठेवू नका

गुलाबाला भरभरुन फुले येण्यासाठी सूर्यप्रकाश खूप गरजेचा असतो. पूर्ण सावलीत ठेवल्यास रोपाची वाढ कमकुवत होते आणि कळ्या कमी येतात.

7 mistakes to avoid when planting new rose plant | Dainik Gomantak

गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नका

नवीन रोप लावल्यावर पहिल्या दिवशी थोडे पाणी द्या, पण रोजच माती चिखल होईल इतके पाणी घालू नका. माती कोरडी वाटल्यावरच पाणी द्या, जेणेकरुन मुळे सडणार नाहीत.

7 mistakes to avoid when planting new rose plant | Dainik Gomantak

Vastu Tips: घरातील तुळशीचे रोप बदलू शकते तुमचे नशीब! कोणत्या दिशेला लावल्याने बरसते संपत्ती?

आणखी बघा