Manish Jadhav
जम्मू-काश्मीरमध्ये 2023 च्या अखेरीस शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला. 21 डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला.
21 डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरीला भेट दिली होती.
आता गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पूंछ-राजौरीपासून काश्मीर खोऱ्यापर्यंत दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मोठी रणनीती आखली जात आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय सीमेपलीकडे म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कमांडरसोबत मोठा कट रचण्यात व्यस्त आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सोशल मीडियावर 600 हून अधिक बनावट अकाऊंट सक्रिय करण्यात गुंतले आहेत. या अकाऊंटद्वारे पाकिस्तान प्रायोजित अप्रचार करण्याचा प्रयत्न केला जाईल.
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2018 मध्ये 228 दहशतवादी घटना घडल्या, तर 2023 मध्ये केवळ 44 दहशतवादी घटना घडल्या.
गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील डोंगराळ भागात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलांवर अनेकदा हल्ले केले आहेत.