Manish Jadhav
अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष जेवियर माइली सध्या त्यांच्या एक कृतीमुळे चर्चेत आहेत.
माइली यांचं चर्चेत असणं ही काही नवीन गोष्ट नसली तरी यावेळी त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर केलेल्या पराक्रमामुळे ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
माइली यांनी स्टेजवरच त्यांच्या गर्लफ्रेंडला किस केले, जे पाहून उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले.
याआधीही माइली यांनी आपल्या गर्लफ्रेंडला सार्वजनिकपणे किस केले आहे. नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदासाठीचे मतदान संपले तेव्हाही ते त्याच शैलीत दिसले होते.
अध्यक्ष माइली यांची गर्लफ्रेंड फातिमा एक कॉमेडियन आहे. ती तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली आहे. सध्या ती अध्यक्ष माइली यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांची प्रेमकहाणी इंस्टाग्रामवरुन सुरु झाली.
अध्यक्ष माइली शुक्रवारी त्यांची गर्लफ्रेंड फातिमा फ्लोरेजसह नवीन कॉन्सर्टमध्ये पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान अध्यक्षांनी आपल्या गर्लफ्रेंडला स्मोच केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
माइली म्हणाले की, ''अर्जेंटिनासाठी कठीण काळ आहे, परंतु या कठीण काळात हिम्मत न हारता आपल्याला पुढे जायचे आहे.'' यानंतर त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला सर्वांसमोर किस केले.