Manish Jadhav
स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना बॅटरी लवकर संपण्याची तक्रार सर्वसामान्य झाली आहे. मात्र काही साध्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ टिकवू शकता.
फोनचा स्क्रीन हा सर्वात जास्त बॅटरी खाणारा भाग असतो. स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवल्यास बॅटरीचे आयुष्य वाढते. शक्य असल्यास Auto-Brightness फीचर वापरा.
बऱ्याच अॅप्स बॅकग्राउंडमध्ये काम करत राहतात, ज्यामुळे बॅटरी वेगाने संपते. Settings > Battery > Background usage मध्ये जाऊन अनावश्यक अॅप्स बंद करा.
अॅन्ड्रॉइड आणि आयफोनमध्ये 'Battery Saver' किंवा 'Low Power Mode' हे पर्याय उपलब्ध असतात. हे मोड अॅक्टिव्ह केल्यास बॅटरीचा वापर आपोआप मर्यादित होतो.
फोनचे ऑपरेटिंग सिस्टम आणि अॅप्स नियमितपणे अपडेट करत राहा. नवीन अपडेट्समध्ये बॅटरी ऑप्टिमायझेशनसारख्या सुधारणा असतात.
या साध्या ट्रिक्स अवलंबल्यास तुमचा फोन दिवसभर चालू राहू शकतो.