Akshata Chhatre
आपण दररोज केस धुण्याच्या सवयीमुळेच आपल्या केसांचं नुकसान करत असतो, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
केस गळणं, ड्राय स्काल्प, डँड्रफ अशा अनेक समस्यांमागे एकच सामान्य कारण असतं शॅम्पूचा थेट वापर.
बरेच जण समजतात की महागडे शॅम्पू वापरले की केस सुंदर होतील, पण हे पूर्णपणे खरं नाही.
डर्माटॉलॉजिस्ट आणि ब्यूटी एक्स्पर्ट्स यांच्या मते, शॅम्पू थेट केसांवर न वापरता पाण्यात मिसळून वापरल्यास नुकसान कमी करता येतं.
पण जर त्या पाण्यात नैसर्गिक औषधी घटक मिसळले, तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो.
शॅम्पू पाण्यात मिसळण्याऐवजी औषधी पाण्यात मिसळल्यास केसांना फक्त स्वच्छता नव्हे तर पोषणही मिळतं. १ चमचा मेथी दाणे, ८–१० कढीपत्त्याची पाने,अर्धा कप तांदूळ धुतलेलं पाणी अशा गोष्टी केस वाढायला मदत करतात.