Manish Jadhav
ऑस्ट्रेलियाने पर्थमधील पहिला ॲशेस सामना 8 विकेट्सने जिंकला, ज्यात मिचेल स्टार्कचा महत्त्वाचा वाटा होता.
ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर 'पिंक बॉल'ने खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीही स्टार्कने आपल्या गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव ठेवला.
गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या 9 पैकी तब्बल 6 विकेट्स घेतल्या आणि संघाला वर्चस्व मिळवून दिले.
या शानदार कामगिरीसह, स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या मायदेशात खेळताना 250 विकेट्स पूर्ण करण्याचा मोठा टप्पा गाठला.
मायदेशात 250 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा मिचेल स्टार्क हा जगातील पहिला डावखुरा (Left-arm) वेगवान गोलंदाज ठरला.
मायदेशात 250 हून अधिक बळी घेणारा तो कसोटी क्रिकेटमधील तिसरा डावखुरा गोलंदाज आहे (रंगना हेराथ- 278, रवींद्र जडेजा- 256 यांच्यानंतर).
ऑस्ट्रेलियाकडून मायदेशात 250 हून अधिक कसोटी बळी घेणारा तो केवळ चौथा गोलंदाज आहे. त्याच्या आधी शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्राथ आणि नॅथन लायन यांनीच ही कामगिरी केली आहे.
मिचेल स्टार्कची गणना जगातील दिग्गज गोलंदाजांमध्ये होते. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 418 हून अधिक विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.