Akshata Chhatre
लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. जसा तो मुलींसाठी खास असतो, तसाच तो मुलांसाठीही खास आणि संस्मरणीय असतो.
मात्र अनेकदा मुले लग्नाच्या तयारीकडे हलकं घेऊन पाहतात आणि शेवटच्या क्षणी घाई होते. त्यामुळेच लग्नाच्या आदल्या दिवशी काही गोष्टींना विशेषतः टाळणं गरजेचं आहे
लग्नाच्या एक दिवस आधी लवकर झोपल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजं राहतं. अन्यथा, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांखालची काळी वर्तुळे, जांभया आणि गोंधळलेपणाचा परिणाम दिसून येतो.
बॅचलर पार्टीसारख्या उत्सवांना अति रंग देणं टाळावं. अल्कोहोल किंवा उशीरापर्यंत जागणं यामुळे लग्नाच्या दिवशी डोकेदुखी, सुस्ती आणि चिडचिड होऊ शकते.
आदल्या दिवशी जड, तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. असे अन्न पचन बिघडवून ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ निर्माण करू शकते, जे लग्नाच्या दिवशी त्रासदायक ठरू शकते.
शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता जाणवत असेल, तर स्वतः उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तणाव, काळजी किंवा अंगदुखी यासारख्या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास ते वाढू शकतात.