Akshata Chhatre
नातं संपलं तरी त्यातील भावनिक गुंतवणूक संपत नाही. एकत्र पाहिलेली स्वप्नं आणि घालवलेले क्षण मनावर एक कायमस्वरूपी ठसा उमटवतात, जो पुसणे वेळखाऊ असते.
जुन्या फोटोंवर नजर टाकणं किंवा चॅट्स पुन्हा वाचणं, यामुळे मेंदूला वारंवार त्याच नात्याची आठवण होते. या सवयीमुळे जखमा भरण्याऐवजी पुन्हा ताज्या होतात.
जेव्हा नातं कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय संपतं, तेव्हा 'असं का झालं?' हा एकच प्रश्न मनात घर करतो. या उत्तराच्या शोधात माणूस तिथेच अडकून पडतो.
भविष्यात पुन्हा कोणावर प्रेम करता येईल का? किंवा पुन्हा तशी व्यक्ती मिळेल का? ही भीती माणसाला जुन्या, पण संपलेल्या नात्याला घट्ट धरून ठेवण्यास भाग पाडते.
अनेकदा नातं तुटल्याचा दोष आपण स्वतःला देतो. या प्रक्रियेत आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण त्याच जुन्या नात्यात स्वतःची किंमत शोधू लागतो.
रोजचे फोन कॉल्स, गप्पा आणि भेटी ही एक मानसिक सवय बनलेली असते. नातं तुटल्यावर निर्माण झालेला हा पोकळपणा मेंदूला सहन होत नाही.
जुन्या आठवणींना निरोप देण्यासाठी आधी स्वतःचा स्वीकार करा. स्वतःला वेळ द्या, नवीन छंदांमध्ये मन रमवा आणि भूतकाळाला मागे सोडून पुढे जाण्याचे धैर्य दाखवा.