Sameer Amunekar
मिल्क पावडरमध्ये थोडे मध मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो आणि चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागतो.
उन्हामुळे त्वचा जळजळत असेल किंवा काळवंडली असेल, तर मिल्क पावडरमध्ये कोरफड जेल (Aloe Vera Gel) मिसळून लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनिंग कमी होते.
चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी १ चमचा मिल्क पावडरमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण नॅचरल ब्लीचप्रमाणे काम करते.
झटपट फ्रेश लूक हवा असल्यास मिल्क पावडरमध्ये गुलाब पाणी मिसळून फेस पॅक लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा धुवा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल.
त्वचेवरील साचलेली घाण आणि मृत पेशी काढण्यासाठी मिल्क पावडरमध्ये थोडे बेसन आणि पाणी मिसळून स्क्रबप्रमाणे वापरा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते.
पिकलेले केळे मॅश करून त्यात थोडी मिल्क पावडर मिसळा. हा पॅक लावल्याने त्वचा घट्ट होते आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.
लग्नासाठी किंवा पार्टीसाठी जायचे असल्यास मिल्क पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि थोडे कच्चे दूध मिसळून लावा. यामुळे चेहऱ्यावर सोन्यासारखी चमक येते.