Sameer Amunekar
कपाळावर थंड पाण्यात भिजवलेला टॉवेल किंवा बर्फाची पिशवी ठेवल्याने डोकेदुखी कमी होते. ही पद्धत रक्तवाहिन्यांच्या आकुंचनामुळे वेदना कमी करण्यास मदत करते.
आले व तुळस यामध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात. यांचा गरम चहा प्यायल्याने मळमळ, डोकेदुखी यावर आराम मिळतो.
मायग्रेनमध्ये प्रकाश आणि आवाजामुळे त्रास वाढतो. त्यामुळे अंधाऱ्या, शांत खोलीत विश्रांती घ्या.
रोजचा योगसाधना व प्राणायाम तणाव कमी करतो आणि मायग्रेनच्या त्रासावर नियंत्रण ठेवतो.
थोड्या प्रमाणात कॅफिन (उदा. ब्लॅक कॉफी) घेतल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते. मात्र अति सेवनाने त्रास वाढू शकतो.
थकवा आणि झोपेचा अभाव हे मायग्रेनचे मुख्य कारण असू शकतात. त्यामुळे वेळेवर आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
कपाळावर हलक्याहाताने लॅवेंडर किंवा मेंथॉल ऑइल लावल्यास आराम मिळतो. यांचा सुगंध सुद्धा वेदना कमी करतो.