Sameer Amunekar
पावसाळ्यात डासांचा त्रास खूप वाढतो. पण काही नैसर्गिक झाडं घरात लावल्यास डासांपासून बचाव करता येतो.
तुळशीच्या पानांपासून निघणारा वास डासांना सहन होत नाही. घरात किंवा गॅलरीत ही झाडं ठेवल्यास डास दूर राहतात.
लवंगाचा वास डासांना सहन होत नाही. लवंगाचं झाड घराजवळ लावल्यास त्याचा फायदा होतो.
गवती चहाचं झाड लावल्यास त्याचाही प्रभाव घराच्या वातावरणावर होतो.
पुदिन्याचा वास डासांना नकोसा वाटतो. याचे झाड लावल्यास वातावरण प्रसन्न आणि डासमुक्त राहतं.
झेंडूच्या फुलांमधून येणाऱ्या विशिष्ट वासामुळे डास दूर पळतात. झेंडूमध्ये pyrethrum नावाचं घटक असतं, जे डासांना प्रतिकूल वाटतं.
ही झाडं शक्य असल्यास घराच्या खिडकीजवळ, गॅलरीत किंवा दरवाज्याजवळ ठेवा, जेणेकरून डास घरात शिरणार नाहीत.