Pranali Kodre
संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणाऱ्या ILT20 स्पर्धेचा 2024 चा हंगाम 17 फेब्रुवारीला संपला.
या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या एमआय एमिरेट्सने जिंकले.
एमआय एमिरेट्सने अंतिम सामन्यात दुबई कॅपिटल्सचा 45 धावांनी पराभव केला. या विजयासह पहिल्यांदाच एमआय एमिरेट्सने ILT20 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
अंतिम सामन्यात एमआय एमिरेट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 208 धावा उभारत दुबई कॅपिटल्ससमोर 209 धावांचे आव्हान ठेवले होते.
एमआय एमिरेट्सकडून फलंदाजी करताना कर्णधार निकोलस पूरनने 57 धावांची खेळी केली, तसेच आंद्रे फ्लेचरने 53 धावा केल्या, तर मुहम्मद वासिमने 43 धावांची खेळी केली. गोलंदाजी करताना दुबई कॅपिटल्सकडून जेसन होल्डर, सिकंदर रझा आणि झहिर खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
नंतर 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुबई कॅपिटल्सचा संघ 20 षटकात 7 बाद 163 धावाच करू शकला. त्यांच्याकडून कर्णधार सॅम बिलिंग्सने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तसेच टॉम बँटनने 35 धावांची खेळी केली.
एमआय एमिरेट्सकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट आणि विजयकांत वियासकांत यांनीं प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच अकिल हुसेन, मुहम्मद रोहिद आणि वकार सलामखेईल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.