Pranali Kodre
न्यूझीलंडने 13 ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान हॅमिल्टनला झालेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सने पराभूत करत 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली.
हॅमिल्टन कसोटीत न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात स्टार फलंदाज केन विलियम्सनने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
विलियम्सनने दुसऱ्या डावात 260 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 133 धावांची नाबाद खेळी केली.
विलियम्सनचे हे कसोटी कारकिर्दीतील 32 वे शतक ठरले. त्याने 32 वे कसोटी शतक 172 व्या डावात खेळताना केले आहे.
त्यामुळे विलियम्सन सर्वात जलद 32 कसोटी शतके करणारा खेळाडू ठरला आहे. सर्वात कमी डावात 32 कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विलियम्सनने स्टीव स्मिथला मागे टाकले आहे.
त्यामुळे या विक्रमाच्या यादीत स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. स्मिथने 174 कसोटी डावात 32 शतके केली होती.
या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पॉंटिंग आहे. त्याने 176 कसोटी डावात 32 शतके केली होती.
चौथ्या क्रमांकावर असलेल्या सचिन तेंडुलकरने 179 कसोटी डावात 32 शतके केली होती.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या युनूस खानने 193 कसोटी डावात 32 शतके केली होती.