Manish Jadhav
MG मोटरने आपली नवीन आणि सर्वात आलिशान इलेक्ट्रिक कार MG M9 EV भारतात लॉन्च केली.
ही कार लक्झरी MPV सेगमेंटमध्ये दाखल झाली आहे, जिथे ती सध्याच्या डिझेल किंवा पेट्रोल आधारित MPV कारना आव्हान देईल.
टोयोटा वेलफायरला टक्कर
MG M9 EV चा थेट मुकाबला टोयोटा वेलफायरसारख्या प्रीमियम MPV सोबत होईल, जरी वेलफायर ही ICE (Internal Combustion Engine) कार आहे.
किंमत
इलेक्ट्रिक असूनही M9 EV ची किंमत वेलफायरच्या तुलनेत जवळपास निम्मी आहे. हीची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 69.90 लाख रुपये एवढी आहे.
MG M9 EV मध्ये 90 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी पूर्ण चार्ज झाल्यावर 548 किमीची प्रमाणित रेंज देते. (हीची रिअल-वर्ल्ड रेंज 400-420 किमी असू शकते.)
ही कार 245 bhp पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. यात लक्झरी फीचर्स जसे की, 16-वे ॲडजस्टेबल मसाज सीट्स, ड्युअल रियर एन्टरटेनमेंट स्क्रीन, पॅनोरामिक सनरुफ आणि 13-स्पीकर JBL साउंड सिस्टिम यांचा समावेश आहे.
सुरक्षितता
MG M9 EV ने Euro NCAP आणि ANCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. यात 7 एअरबॅग्स आणि लेव्हल-2 ADAS (Advanced Driver Assistance Systems) सारखे सेफ्टी फीचर्स आहेत.
उपलब्धता
या कारची बुकिंग सुरु झाली असून, ऑगस्ट 2025 पासून याच्या डिलिव्हरी सुरु होण्याची शक्यता आहे. ही कार तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.