Manish Jadhav
मेक्सिकोमध्ये नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यंदाची निवडणूक रक्तरंजित निवडणूक ठरली.
मेक्सिकोच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित ठरलेल्या निवडणुकीत देशाला प्रथमच महिला राष्ट्राध्यक्ष मिळणार आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी तीनपैकी दोन महिला उमेदवार रिंगणात होत्या.
रविवारी मतदान झाल्यानंतर मीडिया आउटलेट्स आणि सत्ताधारी पक्षाने क्लॉडिया शीनबाम यांना मेक्सिकोच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी घोषित केले.
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार असलेल्या शीनबाम या शास्त्रज्ञ, अभियंता आणि मेक्सिको सिटीच्या माजी महापौर आहेत.
शीनबाम या विद्यमान राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
मेक्सिकोच्या अध्यक्षपदासाठीची ही निवडणूक सर्वात रक्तरंजित ठरली. शुक्रवारी मतदानापूर्वी उमेदवार जॉर्ज हुएर्टा कॅब्रेरा यांची निवडणूक रॅलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
कॅब्रेरा यांच्या मृत्यूनंतर ही निवडणूक देशातील सर्वात रंक्तरंजित निवडणूक ठरली. 2021 च्या निवडणुकीत 36 उमेदवारांची हत्या झाली होती. या निवडणुकीतील हत्यांची संख्या 37 वर पोहोचली आहे.