Manish Jadhav
Mercedes-Benz ने भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक कार EQA लाँच केली आहे.
Mercedes-Benz ने भारतीय बाजारपेठेत लाँच केलेली नवीन EQA ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार आहे. ही EV फक्त EQA 250+ नावाच्या सिंगल फुल-लोडेड व्हेरिएंटमध्ये येत आहे.
या इलेक्ट्रिक-SUV मध्ये 70.5kWh बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटर आहे, ज्यासह ते 188bhp पॉवर आणि 385Nm टॉर्क जनरेट करते.
ही इलेक्ट्रिक कार टोटल 4 ड्रायव्हिंग मोडमध्ये येते, ज्यामध्ये कम्फर्ट, स्पोर्ट, इको आणि इंडिविजुअल मोड समाविष्ट आहे. मोडसह, स्टीयरिंग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम आणि पॅडल रिस्पॉन्स एडजस्ट केले जाऊ शकतात.
नवीन मर्सिडीज कारमध्ये 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, हेड-अप डिस्प्ले, दमदार साउंड सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, ऑगमेंटेड रिॲलिटी, इन-बिल्ट नेव्हिगेशन, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, वायरलेस चार्जिंग आणि इलेक्ट्रिक फ्रंट सीट दिली गेली आहे.
मर्सिडीज EQA फक्त 8.6 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग धारण करु शकते. कारचा टॉप स्पीड 160kmph आहे. नवीन ईव्ही कार फूल चार्जवर 560 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.
Mercedes-Benz EQA ची किंमत 66 लाख रुपये आहे, जी एक्स-शोरुमनुसार आहे.