Manish Jadhav
दिवाळीच्या सणाला कोणताही गोंधळ नको असेल, तर लखनवी चिकनकारी कुर्ता हा सर्वोत्तम पर्याय आहे. पांढरा, ऑफ-व्हाइट किंवा पेस्टल रंगांमधील चिकनकारी कुर्ता घातल्यावर अत्यंत क्लासी आणि एलिट लुक मिळतो.
जर तुम्हाला काहीतरी हटके आणि पारंपरिक लुक हवा असेल, तर अंगरखा स्टाईलचा कुर्ता नक्की ट्राय करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजा-महाराजांच्या वेशभूषेची आठवण करुन देतो. यावर पायजामा किंवा चोरस पायजामा खूप छान दिसतो.
जास्त लांब कुर्ता घालणे आवडत नसेल, तर गुडघ्यापर्यंत किंवा त्यापेक्षा लहान असणारे शॉर्ट कुर्तीज उत्तम पर्याय आहेत. हे तुम्ही आरामदायक जीन्स किंवा कॉटनच्या पायजाम्यासोबत घालून एक कूल आणि मॉर्डन फेस्टिव्ह लुक मिळवू शकता.
साध्या प्लेन सिल्कवर भरतकाम केलेले किंवा डिजिटल प्रिंटचे 'नेहरु जॅकेट' घातल्यास पूर्ण लुक एकदम बदलून जातो. हा लुक दिसायला अतिशय भारी वाटतो आणि लग्नसमारंभ किंवा मोठ्या पार्टीसाठी अगदी परफेक्ट आहे.
दिवाळीच्या पूजेसाठी किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी धोती-कुर्ता हा सेट कधीही आऊटडेट होत नाही. हलक्या वजनाचा कॉटन-सिल्क कुर्ता आणि त्याखाली रेडीमेड धोती घातल्यास पारंपरिक संस्कृतीचा सुंदर लुक पाहायला मिळतो.
आजकाल तरुणांमध्ये असिमेट्रिकल (वेगवेगळ्या कटिंग आणि डिझाईनची लांबी असलेले) कुर्ते खूप फॅशनमध्ये आहेत. जर तुम्हाला पारंपारिक लुकमध्ये थोडा मॉडर्न टच हवा असेल, तर हा ट्रेंडी कुर्ता तुम्हाला नक्कीच उठून दिसेल.
दिवाळीच्या संध्याकाळच्या पार्टीसाठी सिल्क कपड्याचा किंवा हेवी कॉलर असलेला 'बंदगला कुर्ता' (Bandhgala) अप्रतिम दिसतो. यावर कोणत्याही जॅकेटची गरज भासत नाही कारण त्याची कॉलर आणि बटणांची डिझाईनच त्याला एक रॉयल आणि डॅशिंग पर्सनालिटी देते.