Akshata Chhatre
अनेक महिलांना आणि मुलींना मासिक पाळीचा त्रास होतो. मराठीत पाळी सुरु होण्याला रज:प्रवृत्तीचा आरंभ असं म्हणतात आणि उतारवयात जेव्हा कायमची पाळी थांबते तेव्हा त्याला रजोनिवृत्ती असं म्हणतात.
प्रत्येक महिलेला मासिक धर्माप्रमाणे महिन्यातून तीन दिवस रक्तस्त्राव सहन करावा लागतो आणि साधारण १२व्या वर्षांपासून ही प्रक्रिया सुरु होते.
महिलेच्या ५०व्या वर्षापर्यंत साधारण रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज सुरु होतो. पाळी येण्याएवढंच पाळी न येणं सुद्धा त्रासदायक ठरू शकतं.
यावेळी शरीरात कोरडेपणा वाढतो, थकवा जाणवतो, आवाज सहन होईनासे होतात.
आयुर्वेदाप्रमाणे याकाळात तुमच्या शरीरतात पित्तवस्तेच्या वातावस्थेला सुरुवात होते आणि वात वाढल्याने हाडांची दृढता कमी होते.
यावर उपाय म्हणून तुम्ही नियमित अभ्यंग सुरु करू शकता, वाताचे संतुलन होण्यासाठी व्यायाम किंवा योगासने हा योग्य उपाय ठरतो.
यावेळी तुम्ही तुमच्या आहारात दूध,खारीक, साजूक तूप यांचा समावेश करावा लागेल. हा शारीरिक बदल असल्याने मानसिक बदलांसाठी तुम्ही तयार असलं पाहिजे.