गोमन्तक डिजिटल टीम
ब्रगांझा हाऊस हा गोव्यातील एक भव्य पोर्तुगीज वाडा आहे. हा वाडा जवळपास १०००० चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. या वाड्याची रचना दोन भागात केलेली आहे.
इथले ग्रंथालय हे गोव्यातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय आहे असे सांगितले जाते. साधारणपणे ५००० पुस्तके इथे आहेत असे म्हणतात.
इथल्या भव्य दालनांमध्ये तुम्हाला अनेक विशेष गोष्टी पाहावयाला मिळतील. पण एक खास अवशेष तुम्हाला पूर्व भागात पाहावयाला मिळेल. तो म्हणजे सेंट फ्रान्सिस झेवियरचे रत्नजडित नख.
ब्रगांझा कुटुंब मूळ हिंदू होते ज्यांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्यात आले. सदर कुटुंब पोर्तुगीज व्यवस्थेसोबत जवळीक ठेऊन होते. पोर्तुगीज राजांनीच ही जमीन त्यांना बहाल केली.
इथे तुम्हाला अनेक पुरातन फुलदाण्या, खास झुंबरे पाहायला मिळतात. 19व्या शतकात पोर्तुगालचा राजा डोम लुइस याने ब्रगांझा कुटुंबाला दिलेल्या खुर्च्याही पाहावयास मिळतात.
इथल्या विशेष दालनांमध्ये संगमरवराच्या अद्भुत रचनेसोबत एक सुंदर बॉलरूमदेखील आहे. बेल्जीयम बनावटीचे झुंबर हे इथले एक विशेष आकर्षण आहे.
जगभरातील प्राचीन वस्तू आणि संग्रहणीय वस्तूंनी भरलेली ही वास्तू पाहायला आपणास मडगाव चांदोर रस्त्यावरून जावे लागते. खाजगी वाहनाने तसेच सार्वजनिक सेवेचा वापर करून आपण इथे सहज पोचू शकता.
गोव्यात या उद्यानांना भेट द्या आणि करा 'दिल गार्डन गार्डन'