Gardens In Goa: गोव्यात या उद्यानांना भेट द्या आणि करा 'दिल गार्डन गार्डन'

गोमन्तक डिजिटल टीम

जपानी गार्डन गोवा

वास्को दा गामा परिसरात डोंगरमाथ्यावर ही बाग आहे. टेकडीवरून खाली निळाशार समुद्र दिसतो. लहान मुलांना सुरक्षित अशी या बागेची रचना आहे. गर्दीपासून दूर असल्यामुळे हे ठिकाण खूप शांत आहे.

Japanese Garden

नेहरू गार्डन

परिवारासोबत जाण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे उद्यान मडगाव येथे आहे. इथे स्थानिक रहिवासी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. इथे असणारा एक चक्रव्यूहासारखा खेळ लहान मुलांना खूप आवडतो.

Nehru Gardens

कॅम्पल गार्डन

संध्याकाळ आरामात घालवायची असेल तर हा उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहे. सुंदर देखभाल केलेली बाग, नौकाविहाराची सुविधा, उंचच्या उंच पाम वृक्षांमुळे या उद्यानाचे सौन्दर्य अधिक खुलते. इथे भगवान महावीर यांची विशाल मूर्ती आपणास पाहता येते.

Campal Gardens

म्युनिसिपल गार्डन

या उद्यानात १६ व्या शतकातील महान लोकांच्या आणि नाविकांच्या सन्मानार्थ बांधलेली स्मारके पाहावयास मिळतात. पणजी येथील या गार्डनमध्ये हिरवेगार लॉन, सुगंधित फुलांचे ताटवे आणि भरपूर वृक्षसंपदा आहे.

Municipal Gardens

स्पाईस गार्डन

गोव्यातील स्पाइस गार्डन खूपच प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही विविध मसाले आणि औषधी वनस्पती पाहू शकता तसेच गाईड तुम्हाला माहितीही देतात. उद्यान परिसरात तुम्हाला गोवन सीफूडचा आनंद घेता येतो.

Spice Garden

सेंट ओरोयासो गार्डन

हे उद्यान मिरामार किनाऱ्यापासून अगदी जवळ आहे. या बागेच्या सभोवताली फिरण्यासाठी मार्ग तयार केला आहे. डेरेदार वृक्षांच्या सावलीत तुम्ही येथे फेरफटका मारू शकता. इथे एक विहीरसुद्धा आहे.

St. Oroiaso Garden

गोव्यातील 'ही' सुंदर गावे तुम्ही पाहिली आहेत का?

Village
आणखी पाहा