Sameer Panditrao
वाढत्या वयानुसार किंवा तणावामुळे विसराळूपणा वाढू शकतो. पण काही सोपे उपाय अवलंबल्यास स्मरणशक्ती सुधारू शकते. जाणून घ्या ७ प्रभावी उपाय!
ध्यान आणि योगा केल्याने मेंदूला विश्रांती मिळते आणि एकाग्रता वाढते. दिवसातून किमान १०-१५ मिनिटे ध्यान करण्याचा प्रयत्न करा.
ओमेगा-३ युक्त अन्नपदार्थ (बदाम, अक्रोड, मासे) आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते.
दररोज ७-८ तासांची शांत झोप मेंदूला ताजेतवाने ठेवते. झोपेच्या कमतरतेमुळे विसराळूपणा वाढतो.
वाचन, कोडी सोडवणे, नव्या गोष्टी शिकणे यामुळे मेंदू सतत कार्यरत राहतो आणि स्मरणशक्ती वाढते.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास मेंदूची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्या.
मोबाईल आणि टीव्हीचा जास्त वापर टाळा. यामुळे मेंदू सुस्त होतो आणि विसरण्याची प्रवृत्ती वाढते.